प्लॅस्टिक व्यापाऱ्यांना 35 हजार दंड; मनपा पथकाची कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
शासनाने बंदी घातलेले प्लॅस्टिक गोडाऊनमध्ये आढळल्याने धुळे महापालिकेच्या पथकाने संबंधित दोन व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल केला. कारवाईत पथकाने दोन टन प्लॅस्टिक मालही जप्त केला.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, उपायुक्त यांच्या आदेशाने महापालिकेचे पथक बुधवारी (ता. २१) शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील एका प्लॅस्टिक गोडाऊनमध्ये कारवाईसाठी गेले.
तेथे दोन टन प्लॅस्टिक आढळून आले. या प्रकरणी पथकाने सतीश राधेश्याम सिंधी यांना २५ हजार रुपये, तर प्रकाशभाई सिंधी यांना दहा हजार रुपये असा एकूण ३५ हजार रुपये दंड केला. दंडाची ही रक्कम पथकाने संबंधित व्यापाऱ्यांकडून वसूल केली.
मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, प्लॅस्टिक बंदी पथकप्रमुख लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे, शुभम केदार, साईनाथ वाघ, मनीष आघाव, रूपेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेच्या पथकाकडून अधूनमधून प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाया होतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default