८४ हजारांची लाच घेताना अधिकारी महिलेला ACBकडून अटक; हात रंगताच ढसाढसा रडली

फुले शाहू आंबेडकर
0
तेलंगणाच्या सरकारी अधिकारी महिलेला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला ८४ हजार रुपयांची लाच घेताना पकडलं. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमरावती: तेलंगणातील महिला अधिकारी ८४ हजार रुपयांची लाच घेताना पकडली गेली. त्यानंतर महिला ओक्साबोक्शी रडू लागली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सरकारी अधिकारी महिलेला लाच घेताना रंगेहात अटक
जगा ज्योती यांनी माझ्याकडून लाच मागितल्याची तक्रार एका व्यक्तीनं एसीबीकडे केली होती. तक्रार करताच एसीबीनं तातडीनं सुत्रं फिरवली. त्यांनी ज्योतीला पकडण्यासाठी एसीबीच्या पथकानं सापळा रचला. ज्योती या सापळ्यात अडकली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला रंगेहात पकडलं. त्यानंतर ज्योती धाय मोकलून रडू लागली. ज्योतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
जगा ज्योतीची फिनोलफथेलिन चाचणी करण्यात आली. तिच्या हातांच्या बोटांची चाचणी पॉझिटिव्ह आली. फिनोलफथेलिनमुळे ज्योतीचे हात गुलाबी झाले. लाच घेणाऱ्यांना पकडण्यासाठी फिनोलफथेलिनचा वापर करण्यात येतो. ज्योती तिच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करायची, लाच घ्यायची, अशी माहिती एसीबीनं दिली. ज्योतीला अटक करण्यात आली असून तिच्याकडून ८४ हजार रुपये जप्त करण्यात आले. सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. तिला हैदराबादच्या न्यायालयात हजर करण्यात आलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default