पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिक शैलपुत्री अपार्टमेंट, जगनाडे ले-आऊट, ओमनगर, कोराडी येथे मिनू रंजन शाय (वय ४३) ही पती रंजन व मुलांसह वास्तव्याला आहे. १९ फेब्रुवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास आरोपी रंजन याने घरी मिनू, १४ वर्षीय भाचा व ८ वर्षीय भाची यांना एका खोलीत डांबले
तसेच सिलेंडरचा पाईप काढून घेत आत गॅस लीक केली. यानंतर हातात माचिस घेत मिनू यांना ठार मारण्याच्या प्रयत्न केला. अपार्टमेंटमधील लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केला. विवेककुमार शिवकुमार लाल (वय ३१, रा. बोरकुटे ले-आऊट, नरेंद्रनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्वरित घटनास्थळी फायर ब्रिगेडला बोलाविले व आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी कलम ३०७, ३३६, २८६, ५०६(२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे
