दारूड्या बायकोच्या रोजच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, पुण्यातून आली धक्कादायक गोष्ट समोर, असं जपा नातं

फुले शाहू आंबेडकर
0
आतापर्यंत तुम्ही पती दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल अशा घटना ऐकल्या असतील. पण पुण्यामध्ये एक वेगळीच घटना ऐकायला मिळाली आहे. पत्नी दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी करत होती. या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे.
पुणे तिथे काय उणे, पुण्यातून एक गोष्टी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. व्यसन करण्यासाठी पती पत्नीकडे पैशांची वारंवार मागणी करायची, पुणे जिल्ह्यातील देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे. पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार पत्नी दारू पिण्यसाठी पतीकडे सतत पैशांची मागणी करत असे. नारायण मधुकर निर्वळ असे आत्महत्या केलेल्याचे पतीचे नाव आहे.
जोडप्यामधील काही गोष्टी एवढ्या बिघडतात की ते टोकाचा निर्णय घेतात. नारायण निर्वळ अॅनिमेशन क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या पत्नीला देखील काही दिवसांपूर्वी 'वर्क फ्रॉम होम' मिळाले होते. या दरम्यान नारायण यांच्या पत्नीने आणि बहीणेने त्यांनी पैसासाठी त्रास दिला. तसेच नारायण यांच्याशी वारंवार भांडणे करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. याला कंटाळून नारायण यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.
नारायण यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाची माहिती पत्नीच्या भावाला देखील सांगितली होती. त्यांच्या मेसेजवरून आणि त्यांनी केलेल्या कॉल वरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोन्ही बहिणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या मागील एक कारण समोर आले आहे ते म्हणजे पती-पत्नीमध्ये सतत होणारे वाद. लग्नानंतर दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू असताना, मागील काही दिवसात व्यसनावरून नव्या वादाला सुरुवात झाली. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांत वाद होत होते.
नाते कोणतेही असो आई-वडिलांचे असो किंवा मित्रांचे, त्याचे मोठेपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आदराशिवाय कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही. आपले नाते दृढ करण्यासाठी एकमेकांचा आदर करणे खूप महत्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default