सोशल मीडियावर विवाहितेचा फोटो शेअर केल्याने वाद पेटला; हाणामारीत तरुणाचा खून

फुले शाहू आंबेडकर
0
सोशल मीडियावर विवाहितेचा फोटो शेअर केल्याने एका तरुणाला मारहाण झाली. मारहाण केल्यामुळे संतापलेल्या तरुणाने जाब विचारणाऱ्यापैकी एकाच्या छातीवर चाकू हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना धुळे जिल्ह्यातील हेंद्रुण गावात घडलीय. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या दोघा भावांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे
या घटनेप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, हेंद्रुण येथील अनिल अशोक सूर्यवंशी गावातील एका विवाहित महिलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला शेअर केला होता. हा प्रकार समजताच विवाहितेचा पती संतापला. फोटो का शेअर केला याचा विचारण्यासाठी विवाहितेचा पती आणि त्याच्या दोन भावांसह अनिलच्या घरी गेला.
पत्नीचा फोटो का शेअर केला असा जाब अनिल सूर्यवंशीला विचारला, त्यावेळी संतप्त झालेल्या अनिल सूर्यवंशीने त्याच्याकडील चाकूने विवाहितेच्या चुलत दिरावर चाकू हल्ला केला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी मोहाडी पोलिसांत अनिल अशोक सूर्यवंशी आणि संतोष अशोक सूर्यवंशी या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर अनिल सूर्यवंशी हा फरार झाला आहे. तर पोलिसांनी त्याचा भाऊ संतोष सूर्यवंशी यास ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर हेंद्रुण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोशल मीडियावर ओळख.. प्रेम.. संशय... अन् हत्या
प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील तुर्भे येथे घडली होती. महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता. यातूनत त्याने तिची गळा दाबून हत्या केली होती. अमित रवींद्र कौर ( वय 35)असं मृत महिलेचं नाव आहे. मृत महिला एका खासगी बँकेच्या मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. तर शोएब शेख (24) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default