मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्हयातील हिमायतनगर येथे ऑनर किलिंगची घटना घडली. परजातीय मुलासोबत पळून गेलेली मुलगी परत घरी आली. पण तिने मुलाशी लग्न करण्याचा हट्ट मुलीने धरला. याच कारणामुळे मुलीच्या आई-वडिलांनी आपल्याच पोटच्या मुलीची हत्या केली.
विळ्याने वार करून 17 वर्षीय अंकिता पवार हिची हत्या केली. मुलगी झोपेत असताना आई - वडिलांनी विळ्याने वार करून तिची हत्या केली. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात मृत मुलीच्या आई -वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेडच्या हिमायतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अंकिताचं एका मुलावर प्रेम होतं. ती त्याच्यासोबत घर सोडून पळून गेली होती. काही दिवसानंतर पु्न्हा घरी आली. मुलगी घर सोडून पळून गेल्याने घरचे खूप चिडले होते. घरी आलेल्या मुलीने त्या मुलाशी लग्न करण्याचा हट्ट आई-वडिलांकडे धरला. त्यानंतर आई-वडिलांनी रागाच्या भरात लेकीचा संपवण्याचा कट रचला.
