जळगाव हादरलं! चाळीसगावमध्ये माजी नगरसेवकावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

फुले शाहू आंबेडकर
0
जळगावमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असताना, जळगावमध्ये माजी नगरसेवकरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. जळगावच्या शहरातील हनुमान वाडी या भागात ही घटना घडली आहे. या गोळीबारात माजी नगरसेवक महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या चाळीसावात माजी नगरसेवकारवर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगावातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला आहे. माजी नगरसेवक महेंद्र मोरे कार्यालयात बसले होते. त्याचवेळी अज्ञात तरुणांनी महेंद्र मोरे यांच्या गोळीबार केला

मोरे यांची प्रकृती चिंताजनक

अज्ञात तरुणांच्या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या गोळीबारात महेंद्र मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

चार ते पाच अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून मोरे यांच्यावर गोळीबार केला आहे. गोळीबारानंतर पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

जळगाव गोळीबार प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, कारमधून पाच जण उतरताना दिसत आहेत. अज्ञात तरुणांनी रुमाल बांधल्याचे दिसत आहे. व्हिडिओत पाचही जणांच्या हातात बंदूक दिसत आहे. त्यांनीच माजी नगरसेवकावर गोळीबार केला. या गोळीबारात मोरे थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. गोळीबार का केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default