शिरपूर/ प्रतिनिधी (ओंकार ईशी.) माजी नगरसेवक गणेश भाऊ सावळे यांच्या वतीने दि.७ फेब्रु.२०२४ रोजी खालचे गाव बौद्ध वाडा शिरपूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवन प्रवासात बाबासाहेबांना मोलाची साथ देणाऱ्या रमाईंच्या जन्म जयंती निमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम माता रमाबाई आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माजी उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,नानासाहेब निशांतजी रंधे सचिव की.वि.प्र.संस्था शिरपूर, के डी पाटील सभापती कृ.उ.बा.स.मा.नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाट,महिला कल्याण व बालविकास अधिकारी वैशाली निकम, प्राचार्या सारिकाताई रंधे, केशवअण्णा सावळे,प्रा.राजू पवार, बाबूदादा खैरनार, दत्ता थोरात, उजनताई केशव सावळे, सुरेश अहिरे,ॲड. शालिनी सोनवणे, यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नानासाहेब निशांतजी रंधे हे होते नगरसेवक गणेश भाऊ सावळे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई रंधे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सारिका ताई रंधे यांनी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले माता रमाई बाबासाहेबांच्या वादळी आयुष्यात न डगमगता सहचारिणी म्हणून उभ्या राहिल्या. वैयक्तिक सुखांचा त्याग करून, प्रसंगी आपली पोटची मुलं गमवल्यावरही त्या खंबीरपणे लढत राहिल्या.समाज हितासाठी हाल अपेष्टा सहन केल्या. त्यांचे स्थान बाबासाहेबांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण आहे. प्रभागातील नगरसेवक गणेश भाऊ सावडे यांचे सामाजिक राजकीय कार्य हे खरंच वाखाण्याजोगे आहे असे प्रतिपादन त्यांनी या ठिकाणी केले. तदनंतर महिला कल्याण व बालविकास अधिकारी वैशाली निकम यांनी विद्यार्थिनींसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली तथा स्त्रीभ्रूणहत्येवर एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली याप्रसंगी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत समाजात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कर्तबगार महिलांचा व प्रपंच सांभाळत आपल्या पोरा बाळांचे शिक्षण करून कुटुंबाच्या मागे ताकदीने उभे राहिलेल्या सर्व महिलांचा म्हणजेच सुमारे ५०० महिलांचा साडी, व लढण्याचे बळ-रमाई हे १२६ जीवन चरित्र ग्रंथ भेट स्वरूप देऊन या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची भूमिका व सूत्रसंचालन सुनील बैसाणे यांनी केले याप्रसंगी आनंदा खैरनार, रोहिदास थोरात, रमेश कढरे,अशोक ढिवरे, रमेश वानखेडे,कल्पनाताई खैरनार, कपिल मोरे, ॲड.योगेश शिरसाट, बापूसाहेब इंदासे, बन्सीलाल शिरसाट, भटू थोरात,ज्वाला मोरे, प्रा. अरुण पवार, प्रा मंजुळा पवार, प्रा. मुकेश सैंदाणे, सोनाली पवार, प्राचार्य डॉ सरोजबाला महिरे प्रा.रंजना बैसाणे, अनिल महिरराव, पनीराज बैसाणे, विक्कीभाऊ ढिवरे, दिनेशभाऊ सावळे ,प्रताप देवरे, विश्वास शिरसाट, शौकीन कुवर, जाकीर बागवान, सतीश खैरनार, खंडू महिरे, गौतम खैरनार, मंगलताई शिरसाट,ॲड.कामीनी वाघ, अनिल आखाडे व सर्व स्तरातील प्रबुद्ध नागरिक स्वयंप्रेरणेने उपस्थित होते.

3/related/default
