सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 26 वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेनिहाय कारवाया करण्यात येत आहेत.
तरुणाबाबत माहिती समजली होती. त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हॉटेल शाहू परिसरात सोमवारी सापळा रचला होता.
वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गणेश लक्ष्मण हाके, वय २६, रा. गोजरे मळा, सिन्नर यास पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. सदर शस्त्र तो कोणाला विक्री करणार होता याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही
त्याच्याविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, हवालदार चेतन संवस्तरकर, प्रविण सानप, हेमंत गरूड, पोलीस शिपाई विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने ही कारवाई केली.
