महाराष्ट्र वाहतोय पवारांचे ओझे; जळगावमधील सभेत शहांची टीका

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव - ‘पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दहा वर्षांत देशाचा चौफेर विकास केला आहे. मात्र गेल्या ५० वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता शरद पवारांच्या पक्षाला निवडून देऊन त्यांचे ओझे वाहतेय. त्यांनी ५० वर्षांत नव्हे तर पाच वर्षात काय केले याचा हिशेब द्यावा,’ अशी परखड टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे केली. जळगाव येथे ‘युवा संवाद’ मेळाव्यात ते युवकांशी संवाद साधताना बोलत होते.
जळगाव येथील सागर पार्क मैदानावर भारतीय जनता पक्षातर्फे ‘युवा संवाद’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी शहा यांनी भारतमातेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार सर्वश्री उन्मेश पाटील, रक्षा खडसे, डॉ. सुभाष भामरे, हीना गावित, आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जयकुमार रावल, संजय सावकारे, रोहित निकम, माजी आमदार स्मिता वाघ आदी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शहा यांचा अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.
शहांची तरुणांना साद

अमित शहा म्हणाले, ‘आगामी निवडणुकीत होणारे मतदान हे केवळ भाजपला विजयी करणारे आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी असणार नाही तर भारतीय युवकांचे भविष्य उज्वल करण्यासाठी असणार आहे. भारताची लोकशाही मजबूत करण्यासाठी असणार आहे.

विरोधी पक्षाची आघाडी ही आपल्या परिवारासाठी आहे. ते आपल्या परिवारासाठीच काम करणार आहेत. ते तुमच्यासाठी काहीच करणार नाहीत. तुमच्यासाठी केवळ नरेंद्र मोदीच आहेत. ते भारताचा विकास करू शकतील.’
कॉँग्रेस राहुलला लॉन्च करतेय पण...

कॉँग्रेसने सत्तर वर्षात काश्मीरचे ३७० कलम हटविले नाही, व्होट बँकेच्या भीतीने राम मंदिर बनविले नाही, परंतु नरेंद्र मोदी यांनी केवळ दहा वर्षात ३७० कलम हटविले तसेच अयोध्या येथे राम मंदिरही बनविले. कॉँग्रेस १९ वर्षांपासून राहुलला लॉन्च करतेय, पण त्यालाही यश येत नाही.

मात्र मोदी यांनी देशाच्या जनतेसाठी अंतराळात चांद्रयान लॉन्च करून भारताचे नाव जगात केले. महाराष्ट्रात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. परंतु, त्या तीनही पक्षांची चाके पंक्चर आहेत. त्यामुळे ते काय विकास करणार आहेत. केवळ भाजपच विकास करू शकते याचा पुनरुच्चार शहा यांनी केला.

शहा म्हणाले,

पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा चारशे पारचा कौल द्या

मतपेढीच्या राजकारणापोटी काँग्रेसने संस्कृतीस मागे टाकले

काँग्रेसने रामलल्लाला ७० वर्षे तंबूमध्येच ठेवले

मोदींमुळेच अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी शक्य

पंतप्रधान मोदींनीच विकसित भारताचे लक्ष्य ठेवले आहे

महाविकास आघाडीची तिन्ही चाके पंक्चर झाली आहेत

घराणेशाहीवाल्यांना देशामध्ये लोकशाही रूचेल का?

विश्वगुरूच्या पदासाठी भाजपला साथ द्यायला हवी

राजकीय आघाडीवर

अकोल्यात गृहमंत्री शहांकडून मतदारसंघांचा आढावा

जळगावमध्ये युवा संमेलनास शहांचे मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगरमध्ये गृहमंत्र्यांची जाहीर सभा

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा

काँग्रेसची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उत्तर मुंबई मतदारसंघाचा दौरा

विवाह सोहळ्यामध्ये शरद पवार आणि युवराज संभाजीराजे यांच्यात चर्चा

ठाकरे गटाला ‘एनडीए’मध्ये यायचे आहे, आदित्य ठाकरेंनी मोदींची भेट घेतली : दीपक केसरकरांचा दावा

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे २२-२३ आमदार परत शरद पवारांकडे येतील : रोहित पवारांचा दावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default