सायबर भामट्यांकडून अलिकडे शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे आमिष दाखवून पैशांचा हव्यास असलेल्या गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचा नवीन फंडा सुरू केला आहे. आत्तापर्यंतच्या चार गुन्ह्यांमध्ये सायबर भामट्यांनी कोट्यवधींचा गंडा घातला असून, नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यात उच्चशिक्षित इंजिनिअरसह त्याच्या दोघांना तब्बल ४८ लाखांची फसवणूक केली आहे
याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोड परिसरात राहणार्या ३४ वर्षीय इंजिनिअर युवकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्याच्यासह दोन मित्रांनी शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविले असता, त्यांची ४७ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी २० सप्टेंबर ते २३ फेब्रुवारी या दरम्यान गंडा घातला आहे.
याप्रकरणी व्हॉट्सअप क्रमांक 7041116371, 9479475042, 9881165583, 9355616924, 7289976985, 9171313959, 8959704419, 9528871634, 8954132586 आणि तक्रारदारांचे पैसे वर्ग झालेले बँक खातेधारकांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आयपी अॅड्रेस, चॅटिंग व लोकेशननुसार तांत्रिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.
ट्रेडिंगमधुन जादा परताव्याचे आमिष
शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाला ३ कोटी ७० लाखांना अशाचरितीने सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. तसेच, एका सेवानिवृत्त व्यक्तीलाही सुमारे अडीच कोटींची फसवणूक केली आहे. या सेवानिवृत्त व्यक्तीने कर्ज काढून संशयितांना पैसे दिले होते. आयुष्याची जमापूंजी गेल्याचे काहींनी पोलिसांसमोर रडतरडत कथन केले होते
दरम्यान, एका गुन्ह्यात सायबर पोलिसांनी परप्रांतीय तरुणास अटक केली असता, त्याच्या बँक खात्यावर काही तासांसाठी २० लाख रुपये आले आणि काही तासांतच ते इतरत्र वर्ग झाले होते. ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले, त्या १०० हून अधिक बँक खात्यांच्या केवायसी बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे बनविण्यात आल्याचे समोर आले आहे.
नाशिक : सायबर भामट्यांकडून अलिकडे शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे आमिष दाखवून पैशांचा हव्यास असलेल्या गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचा नवीन फंडा सुरू केला आहे. आत्तापर्यंतच्या चार गुन्ह्यांमध्ये सायबर भामट्यांनी कोट्यवधींचा गंडा घातला असून, नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यात उच्चशिक्षित इंजिनिअरसह त्याच्या दोघांना तब्बल ४८ लाखांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोड परिसरात राहणार्या ३४ वर्षीय इंजिनिअर युवकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्याच्यासह दोन मित्रांनी शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविले असता, त्यांची ४७ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी २० सप्टेंबर ते २३ फेब्रुवारी या दरम्यान गंडा घातला आहे.
याप्रकरणी व्हॉट्सअप क्रमांक 7041116371, 9479475042, 9881165583, 9355616924, 7289976985, 9171313959, 8959704419, 9528871634, 8954132586 आणि तक्रारदारांचे पैसे वर्ग झालेले बँक खातेधारकांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आयपी अॅड्रेस, चॅटिंग व लोकेशननुसार तांत्रिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.
ट्रेडिंगमधुन जादा परताव्याचे आमिष
शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाला ३ कोटी ७० लाखांना अशाचरितीने सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. तसेच, एका सेवानिवृत्त व्यक्तीलाही सुमारे अडीच कोटींची फसवणूक केली आहे. या सेवानिवृत्त व्यक्तीने कर्ज काढून संशयितांना पैसे दिले होते. आयुष्याची जमापूंजी गेल्याचे काहींनी पोलिसांसमोर रडतरडत कथन केले होते.
दरम्यान, एका गुन्ह्यात सायबर पोलिसांनी परप्रांतीय तरुणास अटक केली असता, त्याच्या बँक खात्यावर काही तासांसाठी २० लाख रुपये आले आणि काही तासांतच ते इतरत्र वर्ग झाले होते. ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले, त्या १०० हून अधिक बँक खात्यांच्या केवायसी बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे बनविण्यात आल्याचे समोर आले आहे.
बनावट ॲपचा वापर
सायबर भामट्यांनी शेअर ट्रेडिंगचे उभेउभं बनावट शेअर ट्रेडिंग ॲप बनविलेले आहे. त्यामुळे सावज हेरून संशयित ते बनावट ॲप खरे असल्याचे भासविले जाते. त्यामुळे ट्रेडिंग करताना २० लाखांची गुंतवणूक केल्यास थोडक्या कालावधीतच ते ३५ ते ४० लाख झाल्याचे दिसते. त्यामुळे गुंतवणूकदाराला हव्यास वाढतो आणि तो आणखी गुंतवणूक करतो.
प्रत्यक्षात जेव्हा ते पैसे काढण्यासाठी प्रयत्न गुंतवणूकदाराकडून केला जातो, त्यावेळी मात्र ते पैसे काढता येत नाहीत. सायबर भामटेही त्यावेळी या ना त्या प्रक्रियेच्या नावाखाली पैसे उकळतात. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येते तोपर्यंत लाखोंची फसवणूक झालेली असते.