बंटी-बबली'ची 'पुष्पा' स्टाईल; हुंड्यात मिळालेल्या गाडीतून करायचे दारुविक्री, अलगद अडकले पोलिसांच्या जाळ्यात

फुले शाहू आंबेडकर
0
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये पोलिसांनी मद्यविक्रीच्या डिलिव्हरीमध्ये सहभागी असलेल्या एका जोडप्याला अटक केली आहे. मद्यविक्री  हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे छुप्या पद्धतीने मद्यविक्री केली जाते. पण बिहारमधील एका जोडप्यानं मद्यविक्रीसाठी अनोखी शक्कल लढविली आहे. 
हे जोडपं हुंडा म्हणून मिळालेल्या आलिशान कारमध्ये वधू-वरांची वेशभूषा करून फिल्मी स्टाईलमध्ये फोन कॉल्सवर ब्रँडेड मद्य पोहोचवत  होतं. मद्य विक्रीसाठी या लोकांनी एक कोड वर्ड तयार केला होता. याद्वारे डिलिव्हरी केली जात होती. सध्या पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
फिल्मी स्टाईलमध्ये मद्यविक्री
मिळालेल्या माहितीनुसार, मदनानी गल्लीत मद्य खरेदी-विक्री होत असल्याच्या माहितीवरून मिठणपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी खरेदीदार असल्याचं भासवून मद्य मागविण्याचे आदेश दिले होते. यानंतर एक तरुण जोडपं आलिशान कारमधून मद्य पोहोचवण्यासाठी आलं होतं. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात महागड्या ब्रँडचं विदेशी मद्य आढळून आलं होतं. पोलिसांनी तात्काळ कार ताब्यात घेऊन जोडप्याला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, मुझफ्फरपूर येथील या जोडप्याने मद्य वितरणासाठी वेगळी पद्धत अवलंबली होती. या दोघांची चौकशी केली असता दोघेही नाव व पत्ते बदलत होते. काटेकोरपणे चौकशी केल्यानंतर या दोघांची ओळख रामबाग परिसरातील सनी उर्फ राहुल आणि त्याची पत्नी जया अशी झाली. या दोघांनी पोलिसांना मद्य व्यवसायाशी निगडित इतर अनेकांची नावे आणि पत्ते सांगितले आहेत. या दोघांच्या ठावठिकाणी पोलिस छापे टाकत आहेत.
पोलिसांनी रचला सापळा
वास्तविक, मिठनपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिसांना एक मुलगी तिच्या पतीसोबत त्यांच्या आलिशान कारमध्ये मद्याची होम डिलिव्हरी करते, अशी माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून ग्राहकांच्या वेशात कोडवर्डमध्ये मद्य मागवलं  होतं.
मद्य पोहोचवण्यासाठी ही महिला मिठणपुरा येथे पोहोचताच पोलिसांनी या जोडप्यााला अटक केली आहे. कारमधून मद्याचा साठा जप्त करण्यात आली आहे. या लोकांनी दारू विक्रीसाठी 'बच्चा, आधार झारखंड, बंगाल खंभा' असे कोडवर्ड तयार केले होते. मिठणपुरा पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default