किराणा दुकानदाराच्या घरावर छापा २ लाखांचा गुटखा जप्त

फुले शाहू आंबेडकर
0
शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात एका किराणा दुकानदाराच्या घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन लाखांचा सुगंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त केली. या प्रकरणी संशयित दुकानदाराला ताब्यात घेतले. राज्यात प्रतिबंधित गुटखा पानमसाल्याची शहरासह जिल्ह्यात विक्रीच्या उद्देशाने तस्करी केली जात असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कारवाईचे निर्देश दिले.
या अनुषंगाने पोलिस निरीक्षक शिंदे यांनी तपास सुरू केला. साक्री रोड येथे राकेश भारतलाल रेलन (रा. ब्लॉक क्रमांक जी ३, रूम क्रमांक ५, कुमारनगर, साक्री रोड, धुळे) याने त्याच्या घरी गुटख्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याची माहिती मिळाली.

एलसीबी पथकाने कुमारनगरातील राकेश रेलन या किराणा दुकानदाराच्या घरावर छापा टाकला. घरात दोन लाख ९ हजार ३१६ रुपयांचा अवैध गुटखा साठा आढळला. पोलिसांनी माल जप्त 
संशयित राकेश रेलन याला ताब्यात घेत त्याच्याविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे, श्रीकृष्ण पारधी, बाळासाहेब सूर्यवंशी.

संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, संतोष हिरे, तुषार सूर्यवंशी, प्रकाश सोनार, देवेंद्र ठाकूर, कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default