विद्यार्थ्याचा झोपेतच कोयत्याने वार करून खून

फुले शाहू आंबेडकर
0
खडकवासला - मणेरवाडी, घेरा सिंहगड परिसरातील आनंदवन सोसायटीमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्यावर झोपेतच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रकाश हरीसिंग राजपूत असे मृत‌ विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो खानापूर येथील विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. त्याची आई सोसायटीच्या परिसरात कामगार आहे. येथील कामगारांच्या खोलीमध्ये तो आई आणि भावासमवेत राहत होता. दररोज दुपारी शाळेतून आल्यावर तो जेवून झोपत असे
आज‌ही‌ तो शाळेतून आल्यावर झोपला होता. तो झोपेत असतानाच त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. शेजाऱ्यांनी पोलिसांना हा प्रकार कळविला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default