ज्ञानदेव नारायण गर्जे (वय ५०, रा. तपोवन रोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. गर्जे हे राहुरी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर मंगळवारी (ता.५) रात्री उशिराने राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राहुरी शहरातील मोटवानी वाईन शॉपच्या व्यवस्थापकांनी याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
गर्जे यांनी वाईन शॉपमध्ये नगर जिल्ह्यातून लिकर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांवर व तक्रारदारावर कारवाईची व दुकानाचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली होती. कारवाई न करण्यासाठी दरमहा वीस हजारांची मागणी केली होती. काल गर्जे लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी तक्रारदाराच्या वाईन शॉपमध्ये आले
