राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस हे खरंतर एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक. पण मग फडणवीसांनी त्यांना असं कुठलं आवाहन केलंय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर फडणवीसांनी राहुल गांधींना नुकताच प्रदर्शित झालेला रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनीत स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा पाहण्यासाठी फक्त हो म्हणावं, मी त्यांच्यासाठी माझ्या पैशानं संपूर्ण थिएटर बुक करतो, असं आवाहन केलं आहे
मुंबईत शनिवारी स्वातंत्र्यवीर सावकर हा सिनेमा यातील प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला. यानंतर थिएटरबाहेर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रियेसाठी घेरलं आणि राहुल गांधींनी सावकरांवर केलेल्या टीकेच्या अनुषंगानं प्रश्न विचारला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी कधीही सावरकर वाचलेले नाहीत किंवा त्यांना समजून घेतलेलं नाही. त्यामुळं ते अशा प्रकारची बिनबुडाच्या गोष्टी सावरकरांबाबत करत असतात
