अफूची पुष्पा स्टाईल वाहतूक, दोघांना अटक; शिरपूर पोलिसांची कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधीत अफूची वाहतूक रोखत मध्यप्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता. पाेलिसांना संशय येऊ नये यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते. पाेलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वाहन तपासले असता चालक व वाहकाचे मनसुबे उधळले गेले
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते.
पळासनेर चेकपोस्टवर नाकाबंदी लावल्यानंतर माहिती मिळालेले वाहन पोलिसांना आढळून आले. संबंधित वाहन थांबवून त्याची तपासणी केल्यानंतर विशेष कप्प्यात पाच लाख 76 हजार रुपये किंमतीची 72 किलो वजनाचे सुकलेल्या अफूची बोंडे, व सात लाख रुपये किंमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किंमतीचे बोलेरा वाहन मिळून एकूण 12 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default