सरपंचांसह कृषी अधिकाऱ्याला नवापुरात लाच घेताना अटक

फुले शाहू आंबेडकर
0
विहिरीच्या दुरुस्तीचे काम शासकीय योजनेतून करू देण्यासाठी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अशोक दौलत बोरसे व देवळीपाडाचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप गावित यांना सात हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
नवापूर पंचायत समितीत बुधवारी (ता.२८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार देवळीपाडा येथील शेतकरी असून त्यांच्या आईच्या नावाने देवळीपाडा (चितवी) शिवारात शेतजमीन असून त्या शेतात असलेली विहिर दुरुस्तीचे काम शासनाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत मंजूर होते. यासाठी सात हजार रुपयाची मागणी केली.

तडजोडीअंती सहा हजार पाचशे रुपये नवापूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अशोक दौलत बोरसे यांच्या नावे देवळीपाडा सरपंच प्रदीप गावित यांनी नवापूर येथील हॉटेल शिवम येथे स्वीकारताना जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत अटक केली
अशोक बोरसे व प्रदीप गावित यांच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी.

उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय ठाकरे, पोलिस नाईक देवराम गावित, सुभाष पावरा यांनी कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default