काय आहे प्रकरण?
तक्रारदार यांच्या चुलतभावाचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले असून त्यांनी त्यांच्या हयातील इन्शुरन्स कंपनीकडुन वैयक्तिक 2 कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेतली होती. त्यांच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनीधीने सदर पॉलिसीची रक्कम वारसांचे नांवे जमा न करता परस्पर दुस-याचे नांवे जमा करुन फसवणुक केल्याप्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफअली सैय्यद यांच्याकडे होता. या गुन्हयातील दुस-याच्या नावे जमा झालेली गोठविण्यात आलेली विम्याची रक्कम वारसांच्या बँक खात्यात जमा होनेकरीता तक्रारदाराच्या वहिनीने कोर्टात अर्ज केला होता. या अर्जावरुन कोर्टात सकारात्मक अहवाल देण्याकरिता तपासी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफअली सैय्यद यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
