वर्तुळ/प्रतिनिधी ( ओंकार ईशी) नवजीवन लोकविकास संस्था, मुंबई व महेंद्रा कंपनीद्वारे रामचंद्र हॉल वडगाव शेरी,पुणे येथे भव्य असे नवजीवन युथ फेस्टिवल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्या कार्यक्रमात एकूण ३५०युवक व २० नामांकित कंपनी सहभाग घेतला होता या *कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री. निलेश गुजर (बिजनेस युनिट हेड महिंद्रा असो लो)यांच्या शुभ हस्ते माननीय श्री प्रमोद भाई सोमजी पटेल यांना कर्मयोगी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी नवजीवन लोकविकास संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री किशोर पाटील यांनी सांगितले-ग्रामीण भागातील युवकांना पुरस्कार देऊन त्यांना सामाजिक कामाची आवड व्हावी हा हेतू आहे. त्यासाठी ग्रामीण भागातून अतिशय उत्कृष्ट सामाजिक काम करणारे व कोविड काळामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता गोरगरिबांना मदत करणारा प्रत्येकाला सुख दुःखामध्ये सहभागी होणारा व शेतकऱ्यांना मदत करणारा वरुळ तालुका शिरपूर येथील श्री प्रमोद पटेल यांना राज्यस्तरीय कर्मयोगी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमांमध्ये विविध कंपन्यांचे एमडी व पुण्यामधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी कार्यक्रमास सहभागी होते त्यामध्ये ग्रीन सोल्युशन चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सागर अहिवले तसेच बापूराव गजरे डिस्ट्रिक्ट एक्सटेंशन मेडिया ऑफिसर व माननीय मनीषा पाटील सीनियर पोलीस ऑफिसर, राष्ट्रपती ढाल पुरस्कार विजेते श्री बाळासाहेब भोसले उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवजीवन चे सलीम मुल्लाजी श्री किरण गायकवाड साहेब श्री सागर म पाठकडे सो निशा मॅडम वैशाली मॅडम यांनी मोलाची कामगिरी बजावली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय सर यांनी केले आभार प्रदर्शन सलीम मुल्लाजी यांनी केले कार्यक्रमात युवकांनी विविध नृत्य करून दाखवले तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ,कार्यक्रमात व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवकांना सन्मानपत्र देण्यात आले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाले व कार्यक्रमात शेवटी रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
3/related/default
