शिरपूर तालुक्यात या लोकांना मिळाली हक्काची घरं, तुम्ही केला का अर्ज ? नसेल तर पटकन येथे करा अर्ज मिळवा घरकुल

फुले शाहू आंबेडकर
0
दोन महिन्यांत २१६० घरकुलांना मंजुरी, तुम्ही अर्ज केला का? जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दिला घरकुलांसाठी मोफत वाळूचा प्रस्ताव : जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनेअंतर्गत दोन महिन्यात २१६० घरकुले मंजूर करण्यात आली आहे. शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी अर्ज करावे,
असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मोफत रेतीसाठी सुधारित प्रस्ताव :- मोफत वाळूसाठी सुधारित प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. लाभार्थी घरकुलासह वाळूची मागणी करण्यात आली आहे.
कोणत्या योजनेत किती? :- मोदी आवास योजना मोदी आवास योजनेमध्ये १ हजार ४३० घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेतील लाभार्थीना मदतीचा पहिला हप्ता वळता करण्यात आला आहे. या कामाला गावपातळीवर गती मिळाली आहे.
रमाई आवास योजना :- रमाई आवास योजनेत २ हजार ४९३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या लाभार्थीना शासकीय नियमानुसार घरकुल पूर्ण करावे लागणार आहे. आतापर्यंत १३९४ घरकुले पूर्ण झाली आहेत
शबरी आवास योजना :- शबरी आवास योजनेत ६०२३ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या लाभार्थींचा घरकुलाच हप्ता मिळाला. अनेकांना घरकुलासाठी अपुरा निधी ठरत आहे. आतापर्यंत २६६४ घरे पूर्ण झाली आहेत.
योजनांसाठी निकष काय?

मोदी आवास :– बीसी, एसबीसी, व्हीजे, आर्थिकदृष्ट्या मागास, एका कुटुंबात एकाला, जागा पाहिजे, जीर्ण अवस्थेतील घर पाहिजे. या सर्व बाबींची नोंद घेतली जाते.
रमाई आवास :- शबरी आवास एसटी घटकासाठी शबरी आवास योजनेतील घरकुलांना मंजुरी देण्यात येते. यासाठी ग्रामसभेत ठराव घेतला जातो. यानंतरच घरकुलांना पूर्ण करता येते. एससी घटकासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत घरकुलासाठी लाभार्थी निवड केली जाते. आर्थिकदृष्ट्या मागास घटकासाठी योजना आहे.
शबरी आवास : एसटी घटकासाठी शबरी आवास योजनेतील घरकुलांना मंजुरी देण्यात येते. यासाठी ग्रामसभेत ठराव घेतला जातो. यानंतरच घरकुलांना पूर्ण करता येते.
तहसीलदार घेणार नोंद :- ज्या लाभार्थीना वाळू द्यायची त्या लाभार्थीच्या नावाची यादी तहसीलदार जाहीर करणार आहेत. त्यानुसार प्रत्येक लाभार्थीला निर्धारित वाळू घाटातून मोफत वाळू दिली जाणार आहे. येथून वाळू नेता येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default