प्रेमसंबंधातून तरुणाला बेदम मारहाण, तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू , पाच जणांवर खूनाचा गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
प्रेमसंबंधातून तरुणाला बेदम मारहाण  करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. पोलिसांनी याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

संग्राम हनुमंत साळुंके (वय 22, रा.बारामती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन रेणुसे, आदित्य गवळी, अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका विवाहित तरुणीची संग्राम याच्याशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तरुणीच्या पतीला याबाबतची माहिती मिळाली होती.संग्राम तरुणीला भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती तरुणीचा पती नितीन रेणुसे ला मिळाली होती. त्यांनी संग्रामला गाठले. त्याला दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरात नेले.
तेथे त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला तेथेच सोडून आरोपी पसार झाले. संग्रामला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संग्रामच्या खुन मागचे कारण पोलिसांना समजू शकले (Pune) नव्हते. वैद्यकीय अहवालात त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाले. तपासात संग्रामवर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. बिबवेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default