तिघा बहिणींची फसवणूक; भावासह 10 जणांवर धुळ्यात गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रावर वारसदार असतानादेखील दुसऱ्या महिलांना परस्पर उभे करून बनावट दस्तऐजव तयार करत तिघा बहिणींची फसवणूक झाली. याप्रकरणी भावासह दहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत सुमन सुरित्राम पाटील (वय ६४, रा. कुंडाणे, ता. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुंडाणे येथील जमीन गट क्रमांक १०३/१/अ क्षेत्र एक हेक्टर २४ आर, गट क्रमांक १०३/२ क्षेत्र एक हेक्टर २० आर, तसेच गट क्रमांक १०३/३ क्षेत्र एक हेक्टर २० आर हे सुमन पाटील यांचे वडील रामचंद्र पाटील यांच्या नावे आहे.
त्यांचे निधन झाल्यानंतर रितसर श्रीमती पाटील आणि त्यांची बहीण साळुंकाबाई, कासूबाई हे वारसदार असतानाही परस्पर तिघींच्या जागी रुकमाबाई मोतीराम पाटील, भटाबाई कौतिक पाटील, चंद्रभागाबाई वल्लभ पाटील यांना वल्लभ रामचंद्र पाटील यांनी उभे केले. त्या तिघी बहिणी असल्याचे भासवून त्यांचे बनावट आधारकार्ड तयार करून बोगस अंगठ्यांचे ठसे घेऊन बनावट छायाचित्रे डकवून फसवणूक केली.
साक्षीदार म्हणून भरत वलभ पाटील, गणेश भाईदास पाटील, राजेंद्र मोतीराम पाटील, बापू मोतीराम पाटील, किसन कौतिक पाटील व धनराज कौतिक पाटील यांनी खोट्या स्वाक्षऱ्या‍ करून फसवणूक केली. त्यानुसार भावासह संशयित दहा जणांवर गुन्हा दाखल झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default