याबाबत असे की, जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता. आज मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास चौघे दुचाकीवर बसवून ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गेले. दुपारी २ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात पडलेला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली. मयताच्या अंगावर चटके दिल्याच्या खुणा असून हात आणि पायाला दुखापत केली असल्याचे दिसून येत आहे.
तरुणाच्या खुनाने जळगाव हादरले ; चौघे संशयीत पोलिसांच्या ताब्यात
बुधवार, एप्रिल १०, २०२४
0
जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आलीय. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-३५) असे मयताचे नाव असून. चोरीच्या संशयावरून त्याला चौघांनी मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
Tags
