त्यामुळे या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या साक्री तालुक्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या ४८ तासांमध्ये तसेच मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवणे आवश्यक आहेत.
अनुज्ञप्ती बंदचे क्षेत्र
धुळे जिल्ह्यातील संपूर्ण साक्री तालुक्यात ५ मेच्या सायंकाळी सहापासून पुढे ६ मेला पूर्ण दिवस, तसेच ७ मेस सायंकाळी सहापर्यंत सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील. या कार्यक्षेत्रातील सर्व अनुज्ञप्तीधारकांनी या दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत
