सव्वा लाख पगारी डीवायएसपी 5 हजारांसाठी लाचेच्या जाळ्यात:कर्मचाऱ्यांची हजेरी लावण्यासाठी घेतली लाच
मंगळवार, एप्रिल २३, २०२४
0
धुळे राज्य राखीव पोलिस दलातील बल गट क्र. ६ चे असिस्टंट कमांडर तथा आपत्ती प्रतिसाद दलाचे डीवायएसपी चंद्रकांत पारस्कर यांना पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या घरीच सोमवारी ही कारवाई करण्यात आली. सुमारे सव्वा लाख रुपये पगार असलेले पारस्कर यांनी पाच कर्मचाऱ्यांकडे गैरहजेरी बद्दल प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजारांची मागणी केली होती. कारवाईनंतर पथकाने उशिरापर्यत पारस्कर यांच्या घराची झडती घेतली. परंतु त्यात काहीही सापडले नाही. त्यांना मंगळवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.
Tags
