मुंबईत रात्रीच्या पोलीस नाकाबंदीत पैशांचं घबाड सापडलं, गाडीचा दरवाजा उघडताच सगळेच चक्रावले

फुले शाहू आंबेडकर
0
सध्या लोकसभा निवडणुकीचा काळा सुरु असल्याने या काळात मतदारांना पैसे वाटण्याचे किंवा मोठ्याप्रमाणावर रोख रक्कम सापडण्याचे प्रकार समोर येत आहेत. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शनिवारी रात्री एक चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला.
लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी पैशांचे मोठे घबाड त्यांच्या हाती लागले. भांडूप परिसरात शनिवारी रात्री निवडणूक भरारी पथकाकडून नाकेबंदी करुन गाड्यांची तपासणी सुरु होती. यावेळी सोनापूर सिग्नलवर एका गाडीत मोठ्याप्रमाणावर रोकड  आढळून आली. गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समजते.
गाडीत रोख रक्कम असल्याचे समजल्यानंतर ही गाडी तात्काळ भांडूप पोलीस ठाण्यात नेण्यात आली. याठिकाणी गाडीतील पैशांची मोजणी करण्यात आली. ही रक्कम जवळपास साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे कळाल्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आयकर खात्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर तपासाला सुरुवात केली आहे. 
नेमकं काय घडलं?
निवडणूक भरारी पथकाकडून भांडूपच्या सोनापूर सिग्नलजवळ नाकेबंदी करण्यात आली होती. यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणारी एक गाडी पोलिसांनी अडवली. या गाडीची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये तीन ते साडेतीन कोटी रुपये आढळून आले. व्हॅनमधील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांना या रोकड रक्कमेविषयी समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे निवडणूक भरारी पथकाने ही व्हॅन भांडूप पोलिसांच्या ताब्यात दिली. ही रोकड रक्कम कुठून आणि कशी आली, याबाबत आयकर विभागाचे अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले असून आयकर विभागाचे अधिकारी ,निवडणूक भरारी पथक अधिकारी आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम.के. मढवींना आज न्यायालयात सादर करणार
कळव्यातील केबल व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्याप्रकरणी शनिवारी रात्री नवी मुंबईतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना अटक करण्यात आली होती. एक लाखांची खंडणी घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने एम के मढवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज रविवार असल्याने सुट्टीच्या विशेष सत्र न्यायालयात एम के मढवी याना सादर करणार असून पोलीस अधिकची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे . अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एम के मढवी आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default