या टोळतील महिलांनी पुणे शहराबाहेर आणखी कुठे बाळांची खरेदी - विक्रीचे व्यवहार केले आहेत का ? याचा शोध सध्या वाकड पोलीस घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दांपत्याला वंध्यत्वाची समस्या आहे. अशा दांपत्याची माहिती रुग्णालयामध्ये काम करणारी नर्स या टोळतील महिलांना देत होती. त्यानंतर टोळीतील महिला वंध्यत्व समस्या भेडसावत असलेल्या दांपत्यांना मिळून त्यांना पाच ते सात लाखात नवजात बाळ विकत देण्याचा प्रलोभन देत असायच्या.
त्यासाठी या टोळतील महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले दांपत्य शोधायचे. ज्या दांपत्याकडे दोन पेक्षा जास्त मुले आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. अशा दांपत्याला पैशाचं आमिष दाखवून या टोळीतील महिला गरजवंत दांपत्याला नवजात बाळ विकत होते.
