जळगाव हादरलं! पत्नीसह 9 महिन्यांच्या मुलीची हत्या करत पतीनेही उचललं टोकाचं पाऊल

फुले शाहू आंबेडकर
0
पत्नीचा आणि नऊ महिन्यांच्या मुलीचा निर्घृण खून करत पतीने विहिरीमध्ये उडी मारून स्वतःही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. 
पतीला सोडून दोन महिन्यांपासून माहेरी राहत असलेल्या पत्नीचा आणि नऊ महिन्यांच्या मुलीचा निर्घृण खून करत पतीने विहिरीमध्ये उडी मारून स्वतःही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जळगाव  जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात देऊळगाव गुजरी  येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील  देऊळ गाव गुजरी येथील पोलीस पाटील राजेंद्र इंगळे  यांची विवाहित मुलगी प्रतिभा झनके या तिच्या नऊ महिन्याच्या मुलीसह आपल्या माहेरी राहत होत्या. पतीशी पटत नसल्याच्या कारणावरून त्या माहेरी राहत होत्या. या काळात पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला होता.
पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग अनावर
पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात खदखडत होता. याच रागात पती विशाल झनके हा पत्नीला भेटीसाठी तिच्या माहेरी आला होता. यावेळी घरात कोणी नसल्याने या दोघांच्या मध्ये काय वाद झाला हे समजू शकले नाही. 
पत्नीसह मुलीची हत्या करून पतीने स्वतःला संपवले
घरातील मंडळी काही वेळानंतर घरात आले. यावेळी त्यांना प्रतिभा झनके आणि तिच्या नऊ महिन्याच्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढलून आला तर जवळच्या एका विहिरीत त्यांचा पती विशाल झनके याचा मृतदेह ही आढळून आल्याने या घटनेत आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून एक संपूर्ण कुटुंब बेचिराख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default