धक्कादायक! मातृदिनीच गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त, संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय इंजिनिअरींग तरुणीच होती मास्टरमाईंड

फुले शाहू आंबेडकर
0
इंजिनिअरींग करणारी मुलगी राहत्या घरी लिंग निदान करत असल्याची बाब समोर आलीय. तीच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदान सेंटरवर छापा टाकण्यात आलाय. अवैधरित्या गर्भनिदान करणाऱ्या केंद्रावर सापळा रचून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. संभाजीनगर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका रहिवाश फ्लॅटमध्ये गर्भनिदान चाचणीचा धंदा सुरू होता. इंजीनियरिंग करणारी तरुणी गर्भलिंग निदान केंद्र चालवत होती. यावेळी महापालिकेच्या पथकाला 12 लाख 78 हजारांची अधिक रक्कम मिळून आली आहे.सोबतच गर्भलिंग निदान करण्याचे साहित्य देखील मिळून आले.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख सांगितली जाते, महिलांना त्यांचे हक्क देणारं राज्य म्हणून ओळख आहे. पण समोर आलेली एक माहिती महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे. एकीकडे आपण मातृदिन साजरा करत आहोत तर दुसरीकडे मातृदिनीच गर्भलिंग  निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली.छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली असून, गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. राहत्या घरी इंजिनिअरींग करणारी मुलगी लिंग निदान करत असल्याची बाब समोर आलीय. तीच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आलंय.छ.संभाजीनगरमध्येराहत्या घरी लिंग निदान करणाऱ्या महिलेलेवर कारवाई करण्यात आलीय. छत्रपती संभाजीनगरमधील तिरुपती नगर परिसरात ही कारवाई करण्यात आलीय. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केली जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आले
12 लाख 78 हजारांची कॅश सापडली
आरोग्य विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली असता इंजिनिअरिंग करणारी एक तरुणीकडून हे गर्भनिदान केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी 12 लाख 78 हजारांची कॅश देखील मिळून आली. यावेळी या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य,लॅपटॉप, टॅब देखील मिळून आले. विशेष म्हणजे शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत एक इंजिनिअरिंग करणारी तरुणी गर्भनिदान केंद्र चालवत असल्याचा समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. 
22 जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तरचे प्रमाण घटले
गेल्याच आठवड्यात राज्यातील 22 जिल्ह्यांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चिंता वाटावी एवढी कमी झालेली आहे. राज्यात बंदी असूनसुद्धा गर्भलिंगनिदा आणि गर्भपात जोरात सुरु असल्याचं समोर आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि मुलींचे गर्भपात होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात याबाबत माहिती नमूद केली आहे. त्यामुळे या 22 जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तरचे प्रमाण म्हणजे एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण चिंतादायकरीत्या घटल्याचे समोर आले आहे. तर जालन्यात सर्वाधिक मुलींचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default