राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांना प्राप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने महालकाळी शिवारातील रवींद्र चिंतामण धोबी यांच्या शेत गट क्रमांक ७४/२ मधील पत्री शेडमध्ये बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकला.
संशयित सेन अटकेत
बनावट देशी दारू सुगंधी संत्रा २२८ सीलबंद बाटल्या, बनावट देशी दारू मिश्रित ३०० लिटर एक प्लास्टिक ड्रम, बनावट देशी दारू मिश्रित २०० लिटर एक प्लास्टिक ड्रम, एक हजार लिटर क्षमतेचे एक रिकामे प्लास्टिक ड्रम, २५० लिटर क्षमतेचे दोन रिकामे प्लास्टिक ड्रम, देशी दारू, सुगंधी संत्रा लेबल असलेले बनावट ७२० पुठ्ठे,
देशी दारू सुगंधी संत्राचे बनावट दोन हजार ७८० पत्री बुच, बनावट देशी दारू सुगंधी संत्रा बॅच नंबर आरव्ही १९७ जानेवारी २०२४ चे ४० हजार लेबल, १८० मिलि क्षमतेच्या एकूण दहा जार ९२० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, बुच सीलबंद करण्याचे कॅपिंग मशीन, दोन पाणी मोटार व पाण्याची नळी, एक पाणी शुद्धीकरण आरओ मशीन,
२२ प्लास्टिक ट्रे, एक दारू मिश्रण करणारे हायड्रोमीटर थर्मामीटर मशीन, डिंक सिलिंग टेप, तीन इलेक्ट्रिक बोर्ड वायर, दोन प्लास्टिक नरसाळे, एक मोबाईल, असा एकूण सात लाख १३ हजार २६०रुपयांचा मुद्देमाल आढळला. याप्रकरणी संशयित जोनीकुमार छोटूलाल सेन याला अटक करण्यात आली
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक डी. एल. दिंडकर, डी. पी. नेहुल (शिरपूर), आर. आर. धनवटे (धुळे), दुय्यम निरीक्षक एस. एस. शिंदे, एस. एस. आवटे, पी. बी. अहिरराव, बी. एस. चोथवे, आर. बी. लांजेकर, अभिजित मानकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जितेंद्र फुलपगारे, जवान के. एम. गोसावी, गोरख पाटील, दारासिंग पावरा, विजय नाहिदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
