नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला असून उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचा निर्घुण खून करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. भूषण लहामगे असे हत्या झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक - मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामागेवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये गंभीर मी झालेल्या भूषण लहामागेचा जागीच मृत्यू झाला.
पूर्व वैमनस्यातून भूषण लहामागेची हत्या
नाशिक - मुंबई महामार्गावर भर दिवसा या हत्येचा थरार रंगला होता. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. घटनास्थळी सध्या गोंधळाचे वतावरण सून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी ) घटनास्थळी धाव घेत भूषणचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. भूषणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पूर्व वैमनस्यातून भूषण लहामागेची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस पुढील तपास करत आहेत
