पती-पत्नीला एकमेकांबद्दल समान आदर असायला हवा आणि त्यांच्यापैकी एकाचा आत्मसन्मान दुखावल्याने नात्यात राहण्याबद्दल आणि नातं टिकवण्याबद्दल शंका वाढते. विशेषत: जेव्हा कौटुंबिक हिंसाचार यासारखे गुन्हे नात्यात घडू लागतात. अशा परिस्थितीत काय करणे योग्य आणि काय चुकीचे असा एक प्रश्न आमच्या एका युजरने विचारला आहे ज्याचे उत्तर रिलेशनशिप कोचने दिले आहे.
प्रश्नः माझ्या पतीने माझ्या कानाखाली मारली आणि आता त्याला याबद्दल पश्चाताप वाटतो आहे. पण मी इतकी दुखावली गेली आहे की मी त्यांना माफ करू शकत नाही. आता त्यांनी उपाशी राहायचं ठरवलं आहे. मी काय करू? मानसिक आरोग्य आणि बियेव्हीयर सायन्समधील सल्लागार डॉ. रचना खुराना सिंग यांनी या समस्येबाबत सल्ला दिला. आहे.
डॉ. रचना खुराना सिंग म्हणाल्या की, “तुम्ही या कठीण परिस्थितीतून जात आहात हे ऐकून मला खरोखर वाईट वाटले. कौटुंबिक हिंसाचार कधीही खपवून घेतला जाऊ नये आणि तुमची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी आहे ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.
सर्वप्रथम आपल्या सुरक्षिततेचा विचार करा. तुम्हाला कधीही धोका किंवा असुरक्षित वाटत असल्यास, सपोर्ट आणि मार्गदर्शनासाठी विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा स्थानिक घरगुती हिंसाचार हॉटलाइनशी संपर्क साधण्याचा विचार करा.