जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील, कृषी अधिकारी अभर कोर आदींचे पथक पद्मालय ट्रॅव्हल्स येथे दाखल झाले. पंच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी सहाय्यक नितीन मासोळे, मनोज पाटील उपस्थित होते.
तेथे गुजरातच्या कथित कंपनीचे एचटीबीटी कापूस बियाण्यांची चारशे पाकिटे आठ गोण्यांमध्ये उतरविण्यात आल्याचे दिसले. गुजरातमधील मोरे टुर्स ॲन्ड कार्गो (अहमदाबाद) ट्रॅव्हल्सने कापसाच्या बियाण्यांचे आठ पोते महेश (पूर्ण नाव माहीत नाही) याने धुळ्यातील अशोक भाई (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यासाठी पार्सल म्हणून पाठविल्याचे तपासणीत आढळले
संशयित कापूस बियाणे पाकिटांसोबत डिलिव्हरी चलन, मालाचे पक्के बिल, ई-वे बिल नियमाप्रमाणे आढळले नाहीत. संशयित मालाची अनधिकृत वाहतूक झाल्याचे समोर आले. पंचांसमक्ष तपासणीत गोण्यांमध्ये संशयित कापसाचे बियाणे फायटर ५ जी, श्रीकॉट ४४ आढळले. त्याची किंमत सहा लाख रुपये आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात संशयित व प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे उत्पादन व विपणन करणारी कंपनी, तिचे मालक व जबाबदार व्यक्ती, मोरे टूर्स ॲन्ड कार्गो, महेश व अशोक भाई या चौघांवर गुन्हा दाखल झाला.
कृषी सहसंचालक वाघ यांचे आवाहन
