सविस्तर असे की, दि. १६/०५/२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीत तक्रारदार यांनी सांगितले की, तक्रारदार यांना सन २०२० पासुन राहणीमान भत्ता मिळाला नव्हता. त्यामुळे तक्रारदार यांनी दि. ०२/०५/२०२४ रोजी राहणीमान भत्ता मिळणेकरिता ग्रामपंचायत अढाव यांचेकडे अर्ज केला होता. तक्रारदार याचे राहणीमान भत्त्याचे चेकवर स्वाक्षरी करण्याकरिता तक्रारदार हे संरपंच सौ.जसमाय छोटेलाल मावस्करकडे गेले असता सरपंच सौ.मावस्कर यांनी चेकवर सही करण्यासाठी तक्रारदार यांना २५००० रूपयाची मागणी केली.
प्राप्त सदरच्या तक्रारीवरून दि. १७/०५/२०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान सरपंच सौ. जसमाय छोटेलाल मावस्कर हिने २५,००० रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर सोमवार दि.२०/०५/२०२४ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान सौ.जसमाय छोटेलाल मावस्कर सरपंच अढाव ग्रामपंचायत व छोटेलाल मावस्कर सरपंच यांचे पती यांने तक्रारदार यांचेकडून तडजोडीअंती मागणी केलेली २०,००० रूपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने त्या दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले आहे. दोन्ही आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन धारणी येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे.
