धुळे शहरातील साक्री रोड परिसरात दोन जणांकडून २० मेच्या मध्यरात्री ट्रॅव्हल चालकांचा रस्त्यात अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून जबरन वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर ट्रॅव्हल चालकाने ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर या संदर्भात पोलिसांना माहिती देत हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर धुळे शहर पोलिसांनी तात्काळ यासंदर्भात ॲक्शन घेत पोलीस पथक संबंधित ठिकाणी रवाना केले.
पोलिसांनी तपास करत सदर गुन्ह्यातील दोघा सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या देखील पोलिसांना आढळून आल्या असून, हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले आहे. हे दोघेही नशाखोरी करण्यासाठी ही लूट करीत असल्याचे पोलीस तपासात उघकिस आले असून धुळे शहर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
