परभणीच्या मानवत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोउपनि गजानन रामभाऊ जंत्रे व मानवत येथील खाजगी नोकरदार मंतशिर खान कबीर खान पठाण उर्फ बब्बुभाई यांनी तक्रारदाराकडून रेतीचे जप्त केलेले ट्रक सोडवण्याकरीता १ लाख रूपयांची लाच मागितली होती. न्यायालयात ट्रक सोडविण्यासाठीचा अहवाल सादर करण्यासाठी पोउपनि जंत्रे यांनी खाजगी इसमाकडे तडजोडीअंती ७० हजार रूपये देण्यास सांगीतले. त्यापैकी ५० हजार रूपये न्यायालयाच्या निकालाच्या आधी व २० हजार रूपये निकालानंतर देण्याचे ठरले.
सदर बाब तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार दिली. या नंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. त्या सापळ्यात खाजगी इसम ५० हजार रूपये स्विकारून पळून गेला. त्यानंतर मानवत शहरात लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने मोठ्या शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले. मानवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया करण्यात आली. या कारवाईसाठी नांदेड परीक्षेत्राचे एसीबीचे पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी एसीबीचे पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर यांनी सापळा रचत कारवाई करून पुढील तपास करत आहे
