नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

फुले शाहू आंबेडकर
0
जामनेर (जळगाव) : दारूच्या नशेत राहणाऱ्या मुलाने जन्मदात्या बापाचीच हत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील पळसखेडा बुद्रूक येथे घडली आहे. वडिलांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने हे कृत्य केले असून संशयित आरोपी मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
बाजीराव पवार (वय ५८) असे या घटनेत  मृत झालेल्या बापाचे नाव आहे. बाजीराव पवार हे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. गाडी घेऊन ते बंगळूर येथे जाणार असल्याने ते जेवणासाठी घरी आले. ते निघणार यापूर्वीच सायंकाळी त्यांचा तरुण मुलगा सुमीत हा दारूच्या नशेत घरी आला. यावेळी त्याने दारू पिण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी करू लागला. मात्र वडीलांनी पैसे देण्यास नकार दिला असता सुमितने खिशातून चाकू काढून धारदार शस्त्राने वडिलांच्या मानेवर वार केले.
मुलाने शस्त्राने वार केल्यानंतर बाजीराव पवार हे जखमी अवस्थेतच घराबाहेर पडत झाडाखाली बसले. तेथेच चक्कर येऊन खाली कोसळले. यावेळी गावातील नागरिकांनी उचलून उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आणत असतानाच बाजीराव यांचा मृत्यू झाला. दरम्यान सुमितच्या त्रासाला कंटाळून त्याची आई व बहीणही बाहेरगावी निघून गेले होते.  आठवडाभरातील जामनेर तालुक्यातील ही दुसरी घटना असून, १२ मेस मुलानेच पैशासाठी आईचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default