धुळ्यात गुंगीकारक औषध जप्त; नंदुरबारच्या तरुणाकडे 24 हजार किमतीवर साठा

फुले शाहू आंबेडकर
0
बेकायदा गुंगीकारक औषध साठा बाळगणाऱ्या नंदुरबार येथील तरुणास एलसीबीच्या पथकाने धुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. या कारवाईत तरुणाच्या ताब्यातील २४ हजार ९७५ रुपये किमतीचा गुंगीकारक औषध साठा जप्त केला. अजय राजू कोठारी (वय ३३, रा. जुन्या सरकारी दवाखान्यामागे, परदेशीपुरा, नंदुरबार) हा बेकायदा गुंगीकारक औषध साठा बाळगून धुळे शहरात येणार असल्याची माहिती एलसीबीचे निरिक्षक श्रीराम पवार यांना मिळाली.
याअनुषंगाने येथील बसस्थानक परिसरात एलसीबी पथकाने पाळत ठेवली. रात्री साडेसातच्या सुमारास संशयित तरुण धुळे बसस्थानकात दाखल झाला. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची पोलिस पथकाने झडती घेतली. यात त्याच्याकडे नशेसाठी वापरात येणारा सुमारे २४ हजार ९७५ रुपये किमतीचा गुंगीकारक औषध साठा मिळाला.
या प्रकरणी एलसीबीचे हवालदार हेमंत बोरसे यांच्या फिर्यादीनुसार कोठारीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकातील अमित माळी, प्रकाश पाटील, संजय पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, रवींद्र माळी, सुरेश भालेराव, प्रकाश सोनार, कैलाश महाजन यांनी ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default