शाळेच्या गेटवर अल्ववयीन मुलीचा विनयभंग करायचा, मुलीचे आईने पाठलाग करत पकडलं, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

फुले शाहू आंबेडकर
0
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या 46 वर्षीय आरोपीचा पाठलाग करून महिलेने पकडून दिल्याची घटना मुंबईतील मालाड येथे घडली.
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या 46 वर्षीय आरोपीचा पाठलाग करून महिलेने पकडून दिल्याची घटना मुंबईतील मालाड येथे घडली. महिलेची 13 वर्षांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा आरोपीने विनयभंग केला होता. महिलेने जिवाची बाजी लावत आरोपीला पोलिसांकरवी अटक केले. आरोपी माँटी गरोडिया हा भाईंदर (पश्चिम) येथील रहिवासी आहे
मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी तक्रारदार महिलेची 13 वर्षांची मुलगी आणि तिची मैत्रिण (एक 13 वर्षांची मुलगी) या दोघी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर येत असताना आरोपीने गर्दीचा फायदा उचलून मुलीचा विनयभंग केला. तक्रारदार महिलेच्या मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला असता, सुरुवातीला आपल्या मुलीला गर्दीत कोणीतरी चुकून स्पर्श केला असावा, असे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आरोपी वारंवार तसा प्रकार करत असल्याचे मुलीने आईला सांगितले. त्यावेळी तक्रारदार महिलेने पाळत ठेवून आरोपीला पकडण्याचा निर्णय घेतला.
पीडित मुलीची आई शाळेबाहेर मुलीची वाट पाहत असताना. पीडित मुलगी आल्यावर आरोपी तिच्या जवळ आला. मुलीने त्या आरोपीबाबत आईला खूणवलं. त्यानंतर तक्रारदार महिलेने त्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला आणि गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाच्या मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी गरोडियाला पकडण्यात आले.
आरोपी गरोडिया याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354ड आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी माँटी गरोडिया तुरुंगात डांबले असून कसून चौकशी केली आहे. त्याला लवकरच कोर्टात दाखल करण्यात आलेय. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default