देवळी येथे घडलेल्या एका घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोनेगाव मार्गावर दिवसाढवळ्या भररस्त्यात एका व्यक्तीची दगड घालून हत्या करण्यात आली. या घटनेत 2 महिलाही जखमी झाल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विनोद डोमाजी भरणे राहणार सोनेगाव (आबाजी) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर करण मोहिते असं आरोपीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हत्येचं कारण अस्पष्ट आहे. घटनेनंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन मारहाण करत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सुरक्षेच्या कारणातून आरोपीला वर्धा शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे. तर 2 जखमी महिलांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
