चूक झाली! गर्भवती होताच अल्पवयीन गर्लफ्रेंडला अश्रू अनावर, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
तिच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिला रुग्णालयात नेले. तिथे ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समजली.
प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची खळबळजनक घटना वाळूज परिसरात उघडकीस आलीय. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी १५ वर्षांची असून अत्याचार करणारा मुलगा १८ वर्षांचा आहे. मुलीच्या पोटात दुखायला लागल्यानं तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. आता पोलीसांकडून आरोपी प्रियकराचा शोध घेतला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी वाळूज परिसरात तिच्या आई आणि लहान भावासोबत राहते. नुकतीच ती दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिचे आई-वडील विभक्त झाले आहेत. तर दोन्ही मुलं ही आईकडेच असतात. दोन्ही मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आई एका कंपनीत कामाला जाते.
दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीची गल्लीतच राहणाऱ्या तिच्याच शाळेतील मुलासोबत ओळख झाली होती. दोघांचे एकमेकांवर प्रेमही होते. अल्पवयीन मुलीची आई कामाला गेल्यानंतर आरोपी मुलगा तिला भेटायला घरी यायचा. त्यावेळीच दोघांमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले. तरुणाने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.
दरम्यान, तिच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिला रुग्णालयात नेले. तिथे ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समजली. शेवटी तिला विश्वास घेऊन चौकशी केली असता तिने अल्पवयीन आरोपीचे नाव घेतले. आपल्याकडून चूक झाली, मला मूल नको असं म्हणत ती रुग्णालयातच रडायला लागली. मुलीच्या तक्रारीनुसार अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default