त्या वेळी गळ्यावर थाप मारून चोरट्याने मंगलपोत खेचून नेली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा घडल्यानंतर संशयित पांझरा नदीपात्राकडे पळाल्याची माहिती एलसीबीला मिळाली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तपासासाठी तीन पथके तयार केली. नकाणे रोड, साक्री रोड परिसरात नाकाबंदी करून पांझरा नदीपात्रात संशयिताचा शोध सुरू केला. फिर्यादी महिलेने दिलेल्या वर्णनाचा योगेश ऊर्फ दादाभाई हिरामण पाटील (वय २८, रा. गोताणे, ह.मु. वंजार गल्ली, सुभाषनगर, जुने धुळे) याला पकडले.
त्याच्या झडतीत दोन लाख २३ हजार किमतीची सोन्याची मंगलपोत आढळली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, अमरजित मोरे, संजय पाटील, दिलीप खोंडे, श्याम निकम, धनंजय मोरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, रविकिरण राठोड, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण, संदीप सरग, प्रकाश सोनार, तुषार सूर्यवंशी, शशिकांत देवरे, महेंद्र सपकाळ, सुशील शेंडे, हितेंद्र वाघ, हर्शल चौधरी, अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
