मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाक्याच्या परिसरात वाहनाची तपासणी सुरु होती. अशातच एका वाहनावर संशय आल्याने ट्रक थांबविण्यात आला. चालकाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. संशय आल्याने ट्रक बाजुला करून तपासणी केली असता त्यात बेकायदेशीर तंबाखूचा ३ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी एचआर ४७ ई ५१४० क्रमांकाचा १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १३ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
हाडाखेड येथे ट्रक थांबवला; अवैध तंबाखूसह १४ लाखांचा मुद्देमाल पकडला
सोमवार, जून २४, २०२४
0
हाडाखेड तपासणी नाक्यावरील कारवाई, चालक अटकेत वाहनाची तपासणी करत असताना त्यात अवैध तंबाखूचा साठा आढळून आल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडली. यात ३ लाख ९६ हजार ८०० रुपयांची तंबाखू आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण १३ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक केली आहे.
Tags
