आनंदखेडा गावाजनीक अपघातात पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

फुले शाहू आंबेडकर
0
तालुक्यातील आनंदखेडे गावाजवळ झालेल्या अपघातात साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी हा अपघात झाला. या घटनेने पोलीस दलासह गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गुलाब गोविंदा शिंपी (वय ३६ रा. आनंदखेडा ता. धुळे) असे मयत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते दुचाकीने आनंदखेडा ते साक्री अपडाऊन करायचे.आज दि.२७ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना आनंदखेडे गावाजवळच असलेल्या खाडी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने जीजे १२/७४४७ क्रमांकाच्या ट्रकला मागाहून धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांसह मित्रपरिवारासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांना हिरे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पोकॉं शिंपी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ५ वर्षांची मुलगी, ३ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default