बोंबला! लग्नाच्या दुसऱ्याच रात्री नवरीनं नकळत केलं असं काही; नंतर तिलाही लाज वाटली

फुले शाहू आंबेडकर
0
एका महिलेनं तिच्या लग्नाबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिनं तिच्या लग्नानंतरचा एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा चर्चेत आला आहे.
लग्नानंतर सासर म्हणजे नवरीसाठी घर, घरातील माणसं सर्वच काही नवंनवं असतं. प्रत्येक नवरीचा लग्नानंतर नव्या घरात गेल्यावर काही ना काही एक किस्सा असतो. अशीच एक महिला जिनं तिच्या लग्नानंतरचा किस्सा सांगितला आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच तिनं नकळत असं काही केलं की त्यानंतर तिला स्वतःलाच स्वतःची लाज वाटू लागली. महिलेनं सोशल मीडियावर सांगितलेला हा किस्सा चर्चेत आला आहे.
महिलेनं रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लग्नाबाबत पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, लग्नानंतर त्यांनी शहरातील बारमध्ये मोठी पार्टी करण्याचा प्लॅन केला. ती, तिचा नवरा आणि त्याचे मित्र बारमध्ये गेले. पार्टी सुरु झाली. पण काही वेळाने महिलेला अस्वस्थ वाटू लागलं. माझे पाय इतके थरथरत होते की मी जमिनीवर पडणारच होते, म्हणून मला बारमधून बाहेर नेलं गेलं, असं महिलेनं सांगितलं.
महिलेला झालं काय?
महिलेनं सांगितलं, ती दारूच्या नशेत होती, खूप उलट्या करत होती, रडत होती आणि सर्वांची माफी मागत होती. माझी अवस्था पाहून बारच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवायचं ठरवलं. पण माझ्या नवऱ्याने मला उबेर कॅबमध्ये बसवलं. कॅबमध्येही मला उलट्या झाल्या. माझा नवरा आणि मित्र मला घरी घेऊन गेले. कसेबसे मी घरी पोहचले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा मला भयंकर डोकेदुखी होत होती.
शुद्धीवर येताच वाटू लागली लाज
महिलेने सांगितलं की, मी नकळत केलेल्या सर्व कृती मला आठवू लागल्या. त्यामुळे मला लाज वाटू लागली. त्या रात्रीच्या आधी मी माझ्या पतीच्या मित्रांना ओळखतही नव्हते.लग्नाच्या पहिल्याच रात्री मला असं दारूच्या नशेत पाहून कसं वाटलं असेल, याचाच विचार मी करत होते. एवढंच नाही तर माझ्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. शुद्धीवर आल्यानंतर मी पुन्हा त्या लोकांशी बोललो. माझ्या कृत्याबद्दल माफी मागितली. पण माझ्यावर कोणीही रागावलं नाही. असं असूनहीं मला अजूनही स्वतःची लाज वाटते.
महिलेच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या. बऱ्याच महिलांनी त्यांच्या लग्नानंतरचा असा विचित्र किस्सा सांगितला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default