जावयानं सासरी केलं धक्कादायक कांड, मेहुण्याच्या पत्नीवरच टाकला डाव, तब्बल 12 वर्ष ठेवले संबंध, शेवटी...

फुले शाहू आंबेडकर
0
प्रदीप साव याच्या पत्नीला 12 वर्षांपूर्वी पॅरालिसीसचा अटॅक आला होता. यानंतरच त्याने आपली पत्नीला सोडून दिले आणि आपल्या मेहुण्याच्या पत्नीसोबत राहू लागला. तसेच सुधा देवी हिचा पतीही मानसिक रुपाने कमजोर आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच अत्याचाराच्याही घटना घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुण्याच्या पत्नीसोबत तब्बल 12 वर्षे अनैतिक प्रेमसंबंधाची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
खैरा पोलीस ठाणे हद्दीतील उमनतरी गावातील रहिवासी प्रदीप साव याचे आपल्या मेहुण्याच्या पत्नीसोबत मागील 12 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. त्यामुळे तो सतत आपल्या सासरी केंडीह याठिकाणी यायचा. तसेच अनेक दिवस राहायचा. त्याच्या पत्नीला आणि मुलीला ही बाब माहिती झाली. यानंतर एकच खळबळ उडाली.
यानंतर त्यांनी गावकऱ्यांशी याची तक्रार केली. यानंतर संपूर्ण गावाच्या पंचायतसमोर हे प्रकरण गेले. या दरम्यान, प्रदीप साव आणि त्याची प्रेयसी म्हणजे मेहुण्याची पत्नी सुधा देवी यांनाही बोलवण्यात आले. गावकऱ्यांनी सांगितलेकी, प्रदीप साव याच्या पत्नीला 12 वर्षांपूर्वी पॅरालिसीसचा अटॅक आला होता. यानंतरच त्याने आपली पत्नीला सोडून दिले आणि आपल्या मेहुण्याच्या पत्नीसोबत राहू लागला. तसेच सुधा देवी हिचा पतीही मानसिक रुपाने कमजोर आहे. याचाच फायदा उचलून दोन्ही जण मागील 12 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. तसेच सोबत राहू लागले.
पंचायतीने दिला हा निर्णय -
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी रविवारी सायंकाळी गावात पंचायत बसली. यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांनी आपले म्हणणे मांडले. यानंतर 6 लोकांची समिती तयार करण्यात आली आणि त्यांनी मोठा निर्णय घेतला. या निर्णयाद्वारे, प्रदीप साव याला केंडीह गावातून हाकलून देण्यात आले.
त्याला हा आदेश देण्यात आला की, त्याने परत कधीच या गावात परत येऊ नये. तसेच आपल्या हिश्श्यावर येणारी सर्व संपत्ती आपली पत्नी आणि मुलाच्या नावावर करेल. तसेच त्यासाठी त्याला वेळही देण्यात आला आहे. तसेच सुधा देवी हिलाही उमनतरी गाव न जाण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अनैतिक प्रेमसंबंधाची ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default