कोणी बोलायला आल्यास मी तयार! ठाकरेंची भरसभेतून भाजपला साद; म्हणाले, ही तर आपल्यासाठी संधी!

फुले शाहू आंबेडकर
0
 शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भरसभेतून अब्दुल सत्तारांविरोधात भाजप कार्यकर्त्यांना साद घातली आहे. भाजपकडून कोणी बोलण्यास आल्यास मी तयार असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर: मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. गेल्या पाच वर्षांत राज्यातील दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटले. त्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा काही खळबळजनक घडामोडी घडणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाषण करताना थेट भाजपच्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे.

'काल त्यांच्या व्यासपीठावर सुप्रिया सुळे ताईंना शिवीगाळ करणारा त्यांचा उमेदवार होता आणि त्याच्या प्रचारासाठी मोदी आले होते. म्हणजेच एकूणच या सगळ्यांचाच स्तर खालावलेला आहे. मी इथे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन आणि विनंती करतोय, तुमचे आणि आमचे थोडे मतभेद आहेत, असतील. त्याच्या संदर्भात कोणी माझ्याशी येऊन बोलणार असेल तर मी त्याच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकूया. ही आपल्याला मिळालेली संधी आहे. कारण आपली संस्कृती आणि आपले संस्कार वेगळे आहेत.
अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना साद घातली. सत्तारांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी त्यांनी भाजपला आवाहन केलं. याबद्दल माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 'आम्ही ठाकरेसेनेच्या पराभवासाठी मतदारांना साद घालत आहोत. सत्तारांची उमेदवारी हा पक्षांतर्गत विषय आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही,' असं दानवे म्हणाले.
दानवे आणि सत्तार यांचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सत्तारांच्या पराभवासाठी ठाकरेंना प्रतिसाद देणार का, असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला. त्यावर 'मी राज्य भाजपचा एक प्रमुख नेता आहे. प्रमुख नेता संपूर्ण राज्याचा विचार करतो. तो केवळ एका जागेचा विचार करत नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पराभवासाठी आम्ही लढत आहेत, असं दानवेंनी स्पष्टपणे सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default