शिरपूर तालुक्यातील वरुळ गावात आज माजी नगरसेवक व शिरपूर वरवाडे नगर पालिका क्षेत्राचे प्रमुख व्यक्तिमत्व, मा. गणेश भाऊ सावळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ह्या कार्यक्रमात स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
सकाळी संततुकाराम गोशाळे येथे चारा वाटपाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी गोशाळेतील जनावरांना चारा देऊन त्यांची काळजी घेण्याबाबत महत्त्वाचा संदेश दिला गेला. त्यानंतर, वरुळ येथील वि धोदय आश्रम शाळेत फळे आणि बिस्कीट वाटप केले गेले. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण मिळावा आणि त्यांच्याप्रती सहानुभूती दर्शवावी, ह्याचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या आयोजनात स्थानिक कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका पार केली. यामध्ये प्रमुख कार्यकर्ते म्हणून मुलचंद शिरसाठ, ओंकार ईशी, गौतम मोरे, विलास पाटोळे, किरण अहिरे, रवि पेठेकर, गौतम अहिरे, संजय शिरसाठ, पिन्टु मोरे, सनि देवल मोरे, शिवराम मोहिते, मनोज वाघ, विकास मोहिते, सोनु मोरे, रुत्तीक नगराडे, विजय तावडे, ज्ञानेश्वर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
