शिंदखेडा.प्रतिनिधी ( मनोहर अहिरे) वरझळी (ता. शिंदखेडा) – गावातील वाणाबाई बापु कोळपे (वय ३० वर्षे) या महिला दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून बेपत्ता झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या मु.पो. वरझळी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथे राहत होत्या.
वाणाबाई यांचा उंची अंदाजे ५ फूट ५ इंच, रंग सावळा, बोलण्याची भाषा मराठी, आणि त्या काष्ठासाडी पांढऱ्या रंगाची परिधान करून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा काहीही थांगपत्ता लागत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
त्यांचे पती बापु तुकाराम कोळपे (मो. नं. ८७८८९१६७५३) यांनी यासंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस यंत्रणा तपासात सक्रिय झाली आहे.

